गंगाखेड नगर परिषद कार्यालय समोर चक्री उपोषण/धरणे आंदोलन

    36

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.22मार्च):- महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनाचे राज्य उपाध्यक्ष श्री भगवान बोडके यांच्या सोबत श्री शिवाजी हजारे यानी आज दिनाक २२मार्च रोजीगंगाखेड नगर परिषद कार्यालय समोर चक्री उपोषण/धरणे आंदोलनास बसले आहेत गंगाखेड नगर परिषद मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करणे बाबत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने गंगाखेड नगर परिषद मधील कर्मचाऱ्याच्या आर्थिक व इतर मागण्या कार्यालयाच्या स्तराला प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे त्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य कराव्यात कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

    १) गंगाखेड नगर परिषद च्या प्रशासन विभागातील उर्वरित शिल्लक राहिलेला महागाई भत्ता अदा करणेबाबत २) थकी सहाव्या वेतना ची रक्कम अदा करण्याबाबत ३) कर निर्धारक व प्रशासकीय सेवा राज्यस्तरीय संवर्गातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्ती अंशदान व रजा रोखीकरण अशंत शासन खाती जमा करणेबाबत ४) आदिवासी कर्मचारी श्री शिवाजी अप्पाराव हजारे यांना सेवा जेष्ठ तिचे प्रमाणे वरिष्ठ लिपिकांची वेतनश्रेणी देणे.

    ५) गंगाखेड नगरपरिषदेच्या सुधारित आकृतिबंधाप्रमाणे आरक्षण बिंदु नामावली अद्यावत करणे ६) आश्वासित योजनेमधील पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती साठी माननीय जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणे ७)महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय 5 फेब्रुवारी 2019 च्या अनुषंगाने शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे माननीय न्यायालयाच्या निकालाप्रमाणे विवक्षित प्रकरणे रोजंदारी कर्मचारी यांना समावेश करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त तथा प्रात्यक्षिक नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणे हे आंदोलन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनाचे संस्थापक तथा मार्गदर्शक श्री के.के.आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष श्री भगवान बोडके यांच्या सोबत श्री शिवाजी हजारे आंदोलनं करत आहेत