वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याची द्राक्षबागेत विष पिऊन आत्महत्या

28

🔸बाळासाहेब ठुबे आत्महत्या प्रकरणी ऊर्जा मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी..

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.23मार्च):-तालुक्यातील खेडगाव येथील शेतकरी
बाळासाहेब ठुबे या खेडगाव येथील शेतकऱ्याने वीज तोडली म्हणुन आत्महत्या केली.

या संदर्भात वणी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय रजपूत यांची स्वाभिमानीचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड, चांदवड तालुका अध्यक्ष अभय सूर्यवंशी, मुकुंद आहेर या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले.