ग्रामीण भागातील नाफेड चा माल राम भरोसे

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23मार्च):- नजीकच असलेल्या निंबी, भोजला, शेलू या ठिकाणी गोदामे हे भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी नाफेड चा तुर ,चना, कापूस गठान या मालाची साठवणूक केलेली आहे. सदर गोदाम आठवड्यातून दोन ते तीन दिवस उघडणे असे बंधनकारक असते त्यामुळे मालाची प्रत राखली जाते.परंतु पुसद वखार केंद्र येथे एकच कायमस्वरूपी कर्मचारी आहे साठा अधीक्षक आहे व इतर सर्व कंत्राटी कर्मचारी आहे . त्याच्यांकडे वाशिम येथील कारभार देखील आहे. साठा अधीक्षक वाशिम ते पुसद ये – जा करत असतात. आठवड्यातील चार दिवस हे वाशिम असतात व दोन-तीन दिवस पुसद येथे असतात त्यामुळे ग्रामीण भागातील गोदाम उघडले जात नाही त्यामुळे नाफेड चा मालक खराब होऊ शकतो तसेच मालाची प्रत खराब होत आहे. याचा परिणाम पुसद परिसरातील शेतकऱ्यावर होत आहे.

भविष्यात खराब झालेला मालामुळे नाफेडचे नुकसान होईल त्यामुळे भविष्यात नाफेड आपले खरेदी केंद्र बंद करू शकते तरी या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन स्वतंत्र साठा अधीक्षक द्यावा किंवा आठवड्यातून दोन ते चार दिवस ग्रामीण भागातील गोदाम उघडे ठेवण्यासाठी पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी जेणेकरून माल खराब होणार नाही व परिणामी नाफेड यांची खरेदी ही नेहमी पुसद साठी चालू राहिली परंतु असे न झाल्यास व नाफेडचे नुकसान झाल्यास नाफेड भविष्यात येथील खरेदी केंद्र बंद करेल व त्याचाच फटका पुसद परिसरातील शेतकऱ्यांना बसेल तरी या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी पुसद परीसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.