चंद्रपूर जिल्ह्यात (दि.23मार्च)रोजी 24 तासात 104 कोरोनामुक्त – 112 कोरोना पॉझिटिव्ह

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.23मार्च):-जिल्ह्यात मागील 24 तासात 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 112 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 968 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 242 झाली आहे. सध्या 1313 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 55 हजार 995 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 24 हजार 142 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 374, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 112 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 38, चंद्रपूर तालुका नऊ, बल्लारपूर 10, भद्रावती नऊ, ब्रम्हपुरी आठ, नागभिड तीन,सिंदेवाही सहा, मूल पाच, सावली तीन, पोंभुर्णा एक, राजूरा तीन, चिमूर पाच, वरोरा पाच, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज 69 नवीन कोरोना बाधित तर 30 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.23मार्च):- आज जिल्हयात 69 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 30 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10233 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9784 वर पोहचली. तसेच सद्या 341 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.61 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.33 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.

नवीन 69 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 27, अहेरी 5, आरमोरी 8, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी 9, धानोरा तालुक्यातील 1, एटापल्ली 1, तर वडसा तालुक्यातील 12 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 30 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 20, अहेरी 4, चामोर्शी 2, धानोरा 1, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये गोंडवाना विद्यापीठाजवळ 1, रामनगर 3, कॅम्प एरिया 3, विसापुर 1, गोकुलनगर 1, सर्वोदय वार्ड 1, बस स्टॉपच्या मागे धानोरा रोड 1, इंदाळा 1, वैनगंगानगर एमआयडीसी रोड 1, रेड्डी गोडाऊन 1, कलेक्टर कॉलनी 1, आशिर्वाद नगर 2, बालाजी नगर 1, स्थानिक 1, एसपी मुनघाटे हायस्कुल 1, नंदनवन 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये धरमपूर 1, गिटाली 1, स्थानिक 2, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वाघाडा 1, स्थानिक 5, वैरागड 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एल. बी.पी. हेमलकसा 5, टेकाला 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कुनघाडा 1, स्थानिक 5, मारोडा 2, चाकलपेठ 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये गोडलवाही 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 2, सिंधी कॉलनी 1, आंबेडकर विद्यालय 5 विसोरा 1, कस्तुरबा वार्ड 1, स्थानिक 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 6 जणांचा समावेश आहे.