मौजे मोहा (इ) येथे अण्णाभाऊ साठे नगर मधली होत असलेले गटु बसविण्याचे काम निकृष्ठ दर्जाचे

27

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि 23मार्च):- पासुन 7 कि,मी,अंतरावर असलेले मौजे मोहा (ई) येथील मागील ऑगष्ट 20 मध्येच दलीत वस्तीच्या निधीतुन 3 लाख रुपयाचे सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्याचे कामकाज करण्यात आले होते,पंरतु तो रस्ता निकृष्ठ दर्जेचा झाल्यामुळे शासणाच्या निकषानुसार,व इंस्टीमेंटनुसार न करता सहा महीण्यातच उखडुन गेला आहे, आणी परत त्याच रस्त्यावर तांथुर~माथुर गटु अथरूण तिघांच्या संगणमंतानी बिल काढण्याचा प्रयत्न करित आहेत.

त्यामुळे या पाच लाख रूपयाच्या निधीचा वापर न करता अपहार केल्या जाऊ नये म्हणुन या संदर्भीय दि,18/3/21 रोजी पुसद पंचायत समीती चे गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन देखील आद्याप कोणत्येही कारवाई झाल्याची दिसुन येत नाही,कारण एकाच रस्त्यावर दोन~दोन वेळा काम कसे व का..? असा पश्न पडतो,मोहा या गावात अनेकदा निधीचा वेगळ्या पद्धतिने अपहार केल्याचा आरोप तक्रार कर्ते तथा सामाजीक कार्यकतै बळवंत मनवर यांनी आरोप केला आहे सदर प्रकरणाची चौकशी आठ दिवसाच्या आंत न झाल्यास ना इलाजास्तव आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषणास बसावे लागेल,