माणुसकीची भिंत पुसद कडून शहीद दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन शहिदांना मानवंदना

27

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.23मार्च):- देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिले या सर्वांमध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान कधीच विसरण्या सारखे नाही. प्रतेकाला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदाना बद्दल अभिमान आहे.२३ मार्च रोजी भगतसिंग, सुखदेव ,राजगुरू यांनी स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला सामोरे गेले शहीद झाले म्हणून 23 मार्च हा शहीद दिन म्हणून मानला जातो.

या दिनानिमित्त माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शासनाच्या नियमांचे पालन करून शहीदांच्या प्रतिमेचे पूजन करून कोरोना महामारी बद्दल जनजागृती करण्यात आली तेथील रुग्ण व त्यांचे नातेवाईक गरजू आणि मनोरुग्ण यांना मास्क सॅनिटायझर साबण या उपयुक्त वस्तू शहीद दिनानिमित्त वाटप करून सर्वांना पोळी भाजी दाळ भात जिलेबी देऊन अन्नदान करण्यात आले.

यावेळेस माणुसकीची भिंत चे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सध्याच्या काळात चांगले आरोग्य हीच खरी माणसाची धनसंपदा आहे प्रत्येक माणसाने आपले वागने विचार जेवण शुद्ध ठेवल्यास निश्चितच प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहू शकते प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले यावेळेस,प्रमुख पाहुणे म्हणून नवीन भाऊ जयस्वाल, शेख जमील शेख हनीप, दत्तात्रय बापूराव जाधव ,मिलिंद बागेशवर,विद्या राठोड,प्रज्ञा राऊत,व माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष जगत रावल सदस्य संतोष गावडे दीपक घाडगे प्रमोद ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते, ~~~~~~~~~~~~~~~~~~ *बातम्यासाठी व जाहीराती साठी संपर्क साधा,मो,न,7387878769* ~~~~~~~~~~~~~~~~~~