वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणीसाठी ३३ कोटी रुपये मंजूर

31

🔹ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे विजरोधक पोल यंत्र उभारून शुभारंभ

🔸चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतीसाठी २० कोटी ९२ लक्ष मंजूर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23मार्च):- चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात विज पडून निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे नामदार विजय वडेटटीवार फारच गंभीर झाले. त्यांनी मंत्री, होताच यावर उपाययोजना करण्यासाठी अनेकदा अधिकारी व संबंधित कंपन्यांची बैठका घेतल्या विजय वडेटटीवार यांना यश आले असून त्यांनी स्वत:च्या मदत व पुनर्वसन विभागाकडून चंद्रपूर जिल्हयातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर २० कोटी ९२ लक्ष रूपये तसेच गडचिरोली जिल्हयातील ४७५ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर ११ कोटी ५६ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

या कामाचा शु्भारंभ ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे २२ मार्चला ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र उभारून या कामाचा शुभारंभ केला आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाट होऊन वीज पडून अनेक निरपराध लोकांचा बळी जात आहे तर काही लोक गंभीर जखमी होत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब, त्यांचे संसार उध्वस्त होऊन आर्थिक व माणसिक त्रास त्यांच्या वारसांना सहन करावा लागत आहे.

ही बाब नामदार विजय वडेटटीवार यांना स्वस्त बसू देत नव्हते त्यामुळे त्यांनी मंत्री होताच यावर कायम उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन यावर तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. अखेर वडेटटीवार यांना यश आले असून त्यांच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निधीतून वीज प्रतिबंध यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आले. त्यामुळे प्रथमच: चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाची निवड करून त्यात चंद्रपूर जिल्हयातील 827 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र बसविण्यात येणार असून त्यासाठी २० कोटी ९२ लक्ष रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र बसविण्यासाठी ११ कोटी ५६ लक्ष रुपये याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यातील १ हजार ३०२ ग्रामपंचायतीसाठी ३२ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हे काम युध्द पातळी सुरू करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे २२ मार्चला वीज रोधकपोल यंत्र उभारून शुभारंभ करण्यात आलेला आहे. यावेळेस ब्रम्हपुरी पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर,मेंडकी ग्रामपंचायत सरपंच सौ मंगलाताई इरपाते, माजी जिल्हा परिषद सदस्या भावनाताई ईरपाते, ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मंगलाताई लोनबले, ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्या नयना गुरनुले, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा गभणे, ग्रामपंचायत सदस्या सौ विद्या चौधरी, मंत्रालयाचे अधिकारी,, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,विजरोध पोल उभारणी कंपनी अधिकारी, आदीसह संतोष आंबोरकर,चंदु जेल्लेवार, निरंजन ढवळे व ग्रामपंचायत कर्मचारी, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.