पतंजली परिवार गंगाखेड च्या वतीने शहीद दिवस साजरा

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23मार्च):-दिनांक 23 मार्च रोजी शहरातील दीपक नगर येथे पतंजली योग परिवार गंगाखेड च्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची पुण्यतिथी शहीद दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी पतंजलीचे सोशल मीडिया जिल्हा प्रभारी गोपाळ मंत्री यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पतंजलीचे जिल्हा प्रभारी निखिल वंजारे ,सोशल मीडिया जिल्हा प्रभारी गोपाळ मंत्री, तहसील प्रभारी बालाजी जोशी, भारत स्वाभिमान तहसील प्रभारी अंकुश मदनवाड, युवा तहसील प्रभारी भगवान मुंडे, सह तहसील प्रभारी गोविंद मात्रे, विठ्ठल मुंडे, धोंडीराम वंजारे, योग प्रचारीका लक्ष्मीताई खरात, अभिषेक खरात आदी योग साधकांची उपस्थिती होती.