अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल

27

🔸 ऊसतोड कामगार विवाहित महिलेवर अत्याचार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनधी)

गंगाखेड(दि.24मार्च):-अनुसूचित जाती मागसवर्गीय 20 वर्षीय विवाहीत महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवार दि.21 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील शेतातील ऊस तोड कामगारांच्या टोळीवर घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवार दि.23 रोजी आरोपीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रति्बंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद दुधाटे रा.देऊळगाव दुधाटे असे आरोपीचे नावं आहे. पीडित महिला ही तिचे पती व कुटुंबातील इतर सदस्या सह बळीराजा सहकारी साखर कारखान्याच्या टोळीत ऊसतोड कामगार म्हणून काम करते. सध्या टोळी देऊळगाव शेत शिवारातच ऊस तोडीचे काम करीत आहे.

रविवारी नेहमी प्रमाणे सदरील पीडित महिला ही ऊसतोडणीचे काम करून ते राहत असलेल्या टोळीच्या खोपिंवर येऊन तिने रात्रीचा स्वयंपाक केला.तिचा पती हा दळण दळून आणण्यासाठी देऊळगाव येथे गेला होता. यावेळी सदरील महिला एकटीच तिच्या खोपीवर होती. पतिला येण्यास उशीर होतं असल्याने ती खोपीत झोपली. दरम्यान आरोपी प्रल्हाद दुधाटे याने ती एकटीच असल्याचे पाहून खोपीत जाऊन तिच्यावर अत्याचार केला. तिने आरडा ओरड केली असता त्याने तिचे तोंड दाबून घटनास्थळावरून पसार झाला.

तिच्या ओरडण्याच्या आवाजाने आजू बाजूचे तिचे नातेवाईक उठले असता तिने घडला प्रकार त्यांना सांगितला. यामुळे भितेने भयभीत झालेली सदरील महिला तिच्या पतीसह देऊळगाव येथे तिच्या घरी आली आणि सर्व हकीकत सासू सासऱ्यांना सांगितली. यामुळे घटनेमुळे पीडित सर्व कुटुंबच भयभीत झाले. भीतीमुळेच त्यांना फिर्याद देण्यास उशीर झाला.अशी फिर्याद सदरील पीडित महिलेने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. यामुळे गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी प्रल्हाद दुधाटे च्या विरोधात अनुसूचित जाती प्रति्बंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मिंलिद खोडवे हे करीत आहेत.