सेल्फी काढणाऱ्या दोन्ही सख्ख्या भावांचा धरणात पडून मृत्यू

    73

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    नाशिक(दि.25मार्च):- जिल्हा मालेगाव तालुका विराणे येथील माळमाथा पाणीपुरवठा योजना धरणात येथील रहिवासी असलेला दोन्ही सख्ख्या भावांचा पाण्यात पडून जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटना बुधवार दिनांक 23 दुपारच्या सुमारास घडली अजंग येथील हर्षल देविदास जाधव वय (21) वर्षे व रितेश देविदास जाधव वय (18 )हे दोन्ही भाऊ दुचाकीने निमशेवडी येथे लग्नाला गेले होते.

    दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना रस्त्यावरील विराणे येथील माळमाथा पाणीपुरवठा योजना धरणाजवळ सेल्फी काढण्यासाठी थांबले होते त्यावेळेस किनाऱ्यावर सेल्फी काढत असताना धरणाच्या काठावरील उतारावरून लहान भाऊ रितेश याचा पाय घसरल्याने बुडाला यावेळी त्याला वाचविण्या साठी मोठा भाऊ हर्षलने प्रयत्न केले परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने ते धरणात बुडाले दरम्यान चुलत भाऊ भावेश जाधव मागून येत असताना त्यांचे लक्ष दुचाकी कडे गेल्याने हा प्रकार लक्षात आला यावेळी भावेश यांनी आरडाओरड केली त्यावेळी परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सरपंच नंदकुमार सोनवणे यांना फोन केला.

    यावेळी सोनवणे यांनी धाव घेत मदत केली यावेळी पिंटू माळी यांच्यासह पाच ते सहा आणि पाण्यात उडी मारुन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना वाचण्यात आली नाही या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शेव विच्छेदनसाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते हर्षल हा नाशिक येथे इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात तर लहान दिनेश मालेगावी बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता या घटनेची माहिती गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली जाधव बंधूंच्या पाचात आजी आई वडील असा परिवार आहे