रश्मी हेडे यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार

38

अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार लेखिका रश्मी हेडे यांना जाहीर झाला आहे, असे या संघाचे अध्यक्ष श्री महेंद्र देशपांडे यांनी नुकतेच कळविले आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*अल्प परिचय*

सौ रश्मी हेडे या गेली काही वर्षे विविध विषयांवर लेखन करीत आहेत. विशेषतः कोरोनाच्या काळात सर्व कामकाज ठप्प झाल्याने,समाजात भीतीचे,नैराश्याचे वातावरण निर्माण झाल्याने या काळात त्यांनी सतत जागृती पर, प्रेरणादायी लिखाण केलं आहे. हे लिखाण विविध वृत्तपत्रे, वेबपोर्टल व समाज माध्यमातून सातत्याने प्रसिद्ध झाले आहे . जवळपास ६० लेख त्यांनी लिहिले आहेत.

या लिखाणाबद्दल त्यांना सत्यवादी ह्यूमन राईट्स,मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, नवी दिल्ली, भारतीय महाक्रांती सेना, मुंबई व प्रतिष्ठा फौंडेशन,सांगली या संस्थानी गौरविले आहे. त्यांचे हे लेखन लवकरच पुस्तक रूपाने प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. याचबरोबर सर्व सामान्यांना प्रेरणादायी ठरत असलेलं त्यांचं *बंदिस्त पान* हे आत्मकथन त्या क्रमशः प्रसिद्ध करीत आहेत. लेखन व घरी शिकवणी वर्ग घेण्याबरोबरच त्या सातारा येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात कार्यरत आहेत.