कचरा डंपिंग देतोय आजारांना आमंत्रण-आमदार साहेब असतात स्विच ऑफ

84

✒️इकबाल पैलवान (हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.25मार्च):-स्थानिक नगर परिषदेच्यावतीने स्थानिक विठ्ठलमंदिर वार्ड येथील पांडूरंग महाराज यांचे मठाजवळ डंपिंग ग्राउंड तयार करण्यात आलेले आहे.
या डंपिंग ग्राऊंडवर संपूर्ण शहरातील कचरा आणून टाकण्यात येतो.रात्रीबे रात्री हा कचरा अचानक पेट घेतो आणि त्याचा विषारी धूर सर्व परिसरात पसरतो.हा धूर अतिशय विषारी असून प्राणघातक आहे,परवा संपूर्ण आसमंत धुराने व्यापलेला होता.परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातही बसणे दुरापास्त झाले आहे.

या धुराने श्वास घ्यायला त्रास होत असल्याने श्वसनाचे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली असून घशात धूर गेल्याने खोकल्याची उबळ येते. या लागलेल्या आगीमुळे रात्री झोपणेसुद्धा कठीण झाले आहे.काही व्यक्तींनी आता आमदार साहेबांच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो स्विच आफ दाखवीत आहे.नगराध्यक्ष महोदयांच्या फोनची तीच गत.

या भागात गर्भश्रीमंत किंवा नामवंत व्यक्ती राहत नसल्याने लोकप्रतिनिधी,व प्रशासन दुर्लक्ष करीत असावेत ?
नाही म्हणायला या प्रभागाचे नसलेले नगरसेवक श्री धनंजय बकाने हे माणुसकी दाखवीत या समस्येची दखल घेतात. बाकी सर्व अंधारच आहे.शहरातील समाजसेवक,लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी या प्रकरणाची दखल घ्यावी व या भागात राहत असलेल्या गोरगरीब जनतेची गंभीर आजारात पडण्यापासून मदत करण्याची विनंती परिसरातील नागरीकांनी केली आहे.
हे डंपिंग ग्राउंड या ठिकाणाहून हलवून दूर राष्ट्रीय महामार्गावर घेऊन गेल्यास उत्तम होईल अशी मागणी न.प.सदस्यांसह
या प्रकरणाची दखल घ्यावी