प्रा. गजानन भुरके यांना पि.एचडी

29

✒️अनिल सावळे(गंगाखेड,प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26मार्च):-येथील संत जनाबाई महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.गजानन भुरके यांना प्राचार्य वसंत भोसले,महिला महाविद्यालय,परभणी यांच्या मार्गदशनाखाली ” मराठवाडा विभागातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांची आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासातील भूमिका – विश्लेषणात्मक अध्ययन ” या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी पीएच.डी. पदवी प्रदान केली.

त्यांच्या या यशाबद्दल संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.रमेशराव मोहळकर ,सचिव विजयकुमार शिंदे कोषाध्यक्ष विजयकुमार तापडिया , प्राचार्य बि .एम. धूत, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रामविलास लड्डा ,योगशिक्षक गोपाळ मंत्री संस्थाचालक व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.तसेच सहकार विभागातील निवृत्त लेखापरीक्षक अमृतराव भिवाजी भुरके व बापुराव वाळके(लेखापरीक्षक),
गणपतफोले(लेखापरीक्षक) ,माधव उघडे(अभियंता सा. बा.वि.),अॅड.रविशंकर वागदकर,अनिल जिद्दीवार, यांनी अभिनंदन केले.