प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वाचनालय व जिम सुरू करणारे पी.आय. सेवानंद वानखेडे यांचा सन्मान

28

🔸जिल्हा महिलाध्यक्षा उषा पानसरे यांनी घेतला पुढाकार

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.26मार्च):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, अमरावती जिल्हा महिला विभागांच्या वतीने महिला जिल्हध्यक्षा उषा पानसरे यांच्या हस्ते अचलपूरचे पी.आय. श्री सेवानंद वानखेडे यांना नूकतेच सन्मानित करण्यात आले. करोणाच्या काळात अचलपूरमध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे व अद्यापही सुरूच आहे ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून समाजासाठी झगडतात, नागरिकांना समजावून सांगतात. त्यांनी अचलपूर पोलीस स्टेशनमध्येच गरीब मुलांसाठी सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देऊन वाचनालाय सुद्धा सुरू केले आहे. सदर वाचनलयात अनेक मुले अभ्यासासाठी येत असतात. पुस्तके घरीही घेऊन जातात तेवढंच नाही तर त्यांनी मुलांसाठी जिमची सुध्दा सुविधा केली आहे.

गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी पोलीस स्टेशनला खूप छान पध्दतीने तयार केले आहे. मुलांसाठी वाचनालय व जिम तयार करणारे विदर्भात पहीले पोलीस स्टेशन म्हणून अचलपूरचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. सेवानंद वानखेडे यांना आपल्या पदाचा कुठल्याही प्रकारचा गर्व नाही ते सर्वांच्या सोबत आपूलकी व प्रेमाने वागतात. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, अमरावती जिल्हा महिला विभागांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.