14 जणांना कोंबून एकाच शासकीय अंबुलन्सने हलवले

33

🔸सखाराम बोबडे पडेगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26मार्च):-सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करण्यासाठी पंतप्रधानांपासून सर्वसामान्य माणूसही झटत असताना आरोग्य विभागाकडून मात्र सोशल डिस्टंसिंग नियम पायदळी तुडवल्याचे निदर्शनास आले. कोरोना पेशंटची ने-आण करणाऱ्या एकाच शासकीय अंबुलन्समध्ये तब्बल 14 जणांना पुढील उपचारासाठी गांगाखेहून परभणीला हलविण्यात आल्याने चालवणाऱ्या यंत्रणेकडून सोशल डिस्टंसिंग चे नियम मोडले गेले असल्याची तक्रार धनगर सम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पोंडुळ तांडा तालुका सोनपेठ येथील सात बालकांनी एरंडीच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाली. बेशुद्धावस्थेत त्यांना मिळेल त्या वाहनाने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्थित प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी हलावण्याचे सांगण्यात आले. गंगाखेड हून परभणी ला जाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी १०८ कॉल करतात अंबुलन्स हजर झाली.

पण दिवसभर कोरूना चे पेशंट केलेल्या गाडीतूनच या रुग्णांना व नातेवाईकांना कोंबड्या सारखे भरून ८ वाजत रात्री परभणीला हलविण्यात आले . रात्री सखाराम बोबडे पडेगावकर यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी ही बाब कानावर घातली. त्यानंतर बोबडे यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना मोबाईल द्वारे सदर माहिती कळवत यात दोषी असलेल्या वर कारवाई करण्याची मागणी केली. एकूणच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने एसटी महामंडळावर कारवाई करणारे परभणीचे जिल्हाधिकारी मा दीपक मुगलीकर क्षमतेपेक्षा जास्त पेशंट व नातेवाईक वाहून नेणाऱ्या यंत्रणेवर काय कार्यवाही करतात हे येणारा काळच ठरवेल.