प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिका-यांची विविध पोलीस ठाणेला भेट मोहिम

  47

  ?पालघर जिल्हा कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम

  ✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  पालघर(दि.26मार्च):-कोरोना कालावधीत पोलिसांनी केलेल्या प्रशंसनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करावे आणि पालघर जिल्हा कार्यकरिणीचा परिचय व्हावा, या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिका-यांनी नुकतेच बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे, तारापूर पोलीस ठाणे व वाणगाव पोलीस ठाणेला सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

  यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रा.राजेश संखे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोष कोरे,जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र सावे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अमेय पिंपळे, जिल्हा समनव्यक श्री.अतुल वझे जिल्हा सरचिटणीस श्री.मुकेश सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  याप्रसंगी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख श्री. प्रदीप कसबे, तारापूर पोलीस ठाणेचे प्रमुख श्री. संतोष जाधव व वाणगाव पोलीस ठाणेचे प्रमुख श्री.श्रीकांत शिंदे या सर्वांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पालघर जिल्हा कार्यकारिणी सोबत विविध विषयांवर चर्चा केली आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी एकत्रपणे कार्य करावे अशी ही इच्छा व्यक्त केली.

  सदर मोहिमेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख, राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिलाध्यक्षा दिपीका चिपळूणकर यांची प्रेरणा होती. या मोहिमेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख व सभासदांनी शुभेच्छा दिल्या.