पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत निफाडचे मा आ श्री अनिल कदम ह्यांच शेतकऱ्यांना अनमोल सहकार्य

    39

    ✒️विजय केदारे(निफाड प्रतिनिधी)

    निफाड(दि.26मार्च):-सध्य स्थितीस द्राक्ष पिकाची कोसळलेली मार्केट बघता द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिक ने महाराष्ट्र शासन कृषी विभागच्या विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत ने मुंबई येथे स्टॉल लावून विक्री सुरू केली आहे ! ग्राहक उदंड प्रतिसाद ही देत आहेत! परन्तु काल शिवाजी पार्क येथे मनपा मुंबई च्या अधिकाऱ्यांनी सदर विक्री करण्यास मज्जाव केला असता सदर बाब निफाड चे माजी आमदार *श्री अनिल कदम* ह्यांना कळवताच त्यांनी ताबडतोब दादर येथील शिवसेना भवन ला सम्पर्क करून तेथील पदाधिकाऱ्यांना मनपा अधिकारी ह्यांच्याकडे पाठवून द्राक्ष विक्री करणारे हे शेतकरी आहेत ,शासनाची विकेल ते पिकेल ह्या योजनेअंतर्गत आपला द्राक्ष माल विकत आहे.

    त्यांना कोणताही त्रास देऊ नका अशा सूचना केल्या त्यानंतर सुरळीत द्राक्ष विक्री सुरू झाली! तरी आपण अशा कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे !द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिक आपल्या पाठीशी खम्बीर पणे उभं आहे!ज्या द्राक्ष उत्पादकांना आपला माल स्वतः विकायचा आहे भले ते संस्थेचे सभासद नसतील तरीही आपणास आवश्यक ती मदत केली जाईल ! तरी भाव कोसळले म्हणून विचार करण्यापेक्षा पर्यायी मार्ग शोधले पाहिजे!लवकरच आपण द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिक संस्थेमार्फत नाशिक शहरात द्राक्ष विक्री सुरू करतोय!मा आ श्री अनिल कदम ह्यांच द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिक च्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले