होळी सण साजरा करताना काळजी घ्यावी- अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य यांचे आवाहन

    37

    होळी निमित्ताने सर्व प्रथम आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे,
    या वर्षी आपणास माहितच आहे, कोरोना -19 प्रादुर्भाव आहे, एकत्र जमने, तोंडावर मास्क,किंवा रूमाल,बांधने हँन्ड सँनिटायझर, ने किंवा साबनाने वारंवार हात स्वच्छ धुणे, योग्य ते अंतर, या गोष्टी आपणास अवगत आहे, येणारे प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे आहे, आणि तितकेच महत्त्वाचे पण आहे.

    तेव्हा आपण योग्य खबरदारी घेतली तर बर होईल, होळी साजरी करताना, कुठल्याही प्रकारची झाडाच्या लाकडाची दहन करू नका, शक्यातो, शेणापासुन केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आपण होळी दहन करण्यासाठी वापरू शकता,किंवा खराब झालेले कागद, जळणार्या पण खराब वस्तू सुध्दा आपण होळी दहन करण्यासाठी वापरू शकता, व तसेच ई घणकचरा म्हणून पण ई होळी करू शकता, अगदी साध्या पद्धतीने पण कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी न करता करूया हिच काळाची गरज आहे.

    रंग खेळताना पण शक्यातो नैसर्गिक रंग वापर करावा,कारण रसायनयुक्त रंग जर वापरले तर चेहर्‍यावर डाग पडतील आणि चेहरा धुण्यासाठी विनाकारण पाणी पण वाया जाऊ शकत, त्याच बरोबर हातावर सुध्दा रसायन रंगाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

    ✒️गजानन गोपेवाड (अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य)