मोटरसायकलला कारने दिली धडक- तिघे जखमी

39

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.२एप्रिल):-जवळच्या वणी(छोटी) येथील रहिवासी आपल्या मोटरसाइकलने गावी जात असतांना मागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले असून तिन्ही जखमी सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरिल सुगुणा कंपनीजवळ काल १ रोजी सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान घडला असून इनोवा (एमएच-२७ बीबी- ७७८६)या कारचा चालक शाहबाजखान शमशादखान,मु.कामठी, नागपुर यास पोलिसांनी अटक केली.

कारचालक नागपुर येथून हिंगणघाटमार्गे समोरिल प्रवासास निघाला होता,या दरम्यान मोटरसायकल क्र.एमएच २९-एजे ६७८५ ने विठ्ठल नामदेव मुसळे(४५) हे आपल्या नातेवाईक शितल मुंगले(२२),नानीबाई नामदेव मुंगले(६०)यांना घेऊन हिंगणघाट येथून वणी येथे जाण्यास निघाले असता मागून भरधाव येणाऱ्या इनोवाने धडक दिली.
सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी भादंवी कलम २७९,३३७,३३८अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पोहवा महेंद्र आकरे दिपक हाके .हे करीत आहेत.