आगामी पुसद न. प. निवडणुकीत पक्षाच्या सर्वच राजकीय पक्षा साठी एम. आय. एम पक्ष डोकेदुखी ठरणार

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.3एप्रिल):- शहरात काही दिवसावर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत मागील पुसद न. प च्या निवडणुकीत काही एम. आय.एम पक्षाच्या उमेदवार अतिअल्प मतांनी पराभव झाला होता. पुसद मध्ये एम.आय.एम पक्ष मागील 2016 पासून सक्रिय कार्यरत आहे. एम.आय.एम पक्ष सर्व सामान्य माणसाचा न्याय हक्का साठी नेहमी अग्रेसर असतो त्यांची उनिव पुसद विभागातील ग्राम पंचायतच्या निवडणुकीत एम.आय. एम पक्षाने भर भरून काढली असुन पुसद विभागात व ग्रामीणभागात ग्रामपंचायत निवडणुकीत एम.आय.एम पक्षाचे आठ ठिकाणी एम.आय. एम पक्षाचे उमेदवार यांनी आपला विजय खेचून आनल्याने एम.आय. एम पक्षांनी विजयाचा झेंडा पुसद विधानसभा क्षेत्रावर रोवला आहे.

त्यामुळे पुसद विभागात एम.आय.एम पक्षाच्या पदाधिकारी यांचे मनोबल वाढले आहे अशा उत्साही वातावरण मुळे असंख्य कार्यकर्त्यांच्या काल हा एम. आय. एम पक्षाकडे कल वाढला आहे मोठ्या संख्येने युवक व जेष्ठ हे एम.आय.एम पक्षाकडे आकर्षित होत आहेत याचा फायदा आगामी पुसद न.प. निवडणुकीत एम.आय. एम पक्षाला मिळण्याचे योगा योग मिळेच यात मात्रशंकाच येत नाही,आगामी पुसद विभागात मोठ्या प्रमाणात एम.आय. एम पक्षाचे राजकीय जाळे विणणे सुरू आहे, त्यामुळे आगामी पुसद न. प. निवडणुकीत पक्षाच्या सर्वच राजकीय पक्षासाठी एम. आय. एम पक्ष हे एक डोकेदुखी ठरणार आहे, अगोदर पुसद शहरात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक हाती व बहुमत नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार विजय झाल्या ने काँग्रेस पक्ष कोमात गेलेला आहे.

तर शिवसेना व भाजपा मध्ये राजकीय ताळमेळ बसत नसल्याने या राजकीय पक्षात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच मागील पाच वर्षात सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस जनतेला दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे जनतेत या पक्षाला बद्दल तीव्र नाराजी होत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या राजकीय खटके नेहमी उडत राहतात त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी नगरसेवकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज पडत आहे तर कधी भिक मांगों आंदोलन हि करावे लागत आहे,हि फार मोठी शोकांतिका म्हणावे लागेल कारण सार्वजनिक कामासाठी नगरसेवकांना जर कामासाठी अडथळा निर्माण होत असेल तर सर्व सामान्य माणसाचे काय? असा गंभीर प्रश्न पुसद शहरातील जनतेला पडला आहे हे प्रश्न जर आगामी निवडणुकीत उदयास आले तर मोठ्या प्रमाणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभव चा सामना करावा लागण्याचे संकेत असल्याने एम.आय. एम पक्षासाठी सध्या पोषक वातावरण आहे हे विशेष….? ~~~~~~~~~~~~~~~~~~