वाल्या सेना टीमचे दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय येथे कोवीड सेंटर येथे विविध उपक्रम

    40

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

    दोंडाईचा(दि.3एप्रिल):- उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सँनेटाईझर, मास्क, बिस्किटपुडे, स्प्रे बाँटल इ. वस्तू घेतल्या…व शंभर पांढरे सँनेटाईझर भरलेले स्प्रे अतिगंभीर कोरोनाची परीस्थिती असलेल्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय व कामगार भवन कोवीड सेंटर येथे वाटण्यात आले.
    या उपक्रमाला मदत म्हणून सौ. अनिता ताई सूर्यवंशी अतूर्ली कर, श्री. मनोज सोनवणे दोंडाईचा, श्री. चंद्रकांत शिरसाट शिरपूर, श्री. प्रीतम सोनवणे या सर्वांनी तत्काळ पाठवलेल्या अडीच हजार रुपयाची मदत केली.

    तसेच यावेळी मास्क तसेच पेंशट यांना बिस्किट पुडे ही वाटण्यात येऊन धुळे जिल्ह्यातील वाल्हा टिमचे सक्रिय सभासद अप्पा कोळी, संजय दावळे (पत्रकार), रवीभाऊ शिरसाठ, सचिन चव्हाण यांच्या सहीत सौ गीतांजली ताई कोळी यांनी स्वता सहभागी होऊन रूग्णांना धीर देत खबरदारी घेत सँनेटाईझर व मास्क चा वापर करण्याचे आवाहन केले.

    तसेच कोवीड सेंटर मध्ये काम करणाऱ्या नर्स, डाॅक्टर, वार्डबांँय यांचे आभार मानले.वाल्ह्या सेनेच्या वतीने दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय येथील अनेक पेशंटसाठी मदतकार्य अखंड सुरू असून आज त्यांनी कोवीड सेंटर येथे राबविलेल्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
    रूग्णांनी भरभरून आशिर्वाद दिले.