नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाची बातमी

21

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100

गेवराई(दि.7एप्रिल):-दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबात कोणताही निर्णय झालेला नाही. त्या संदर्भातील परीक्षांबाबत चर्चा बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तर नववी आणि अकरावी परिक्षेबाबात उद्या संध्याकाळी निर्णय होणार आहे. तर, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय पाच दिवसांनंतर होणार आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित होते.