सामान्य दुकानावरील निरबंध हटवून मर्यादित अवधिकरिता दुकाने चालू करण्याची परवानगी देण्यात यावी

81

🔹चिमुर व्यापारी संघटनेचे निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.8एप्रिल):-राज्यातील मिनी लॉक डाऊनच्या निर्णयानंतर राज्यभारतील व्यापारामधे संताप व्यक्त केला जात आहे, या संदर्भात चिमुर व्यापारी संघटनेचे वतीने महाराष्ट्र् राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याणा उपविभागीय अधिकारी चिमुर यांचे मार्फ़त देण्यात आले,सर्व व्यावसायिकांचा जानेवारी ते जुलाई हा व्यावसायिक हंगाम असतो याच हंगामामधे व्यावसायिक सर्वात जास्त उलाढाल करतो, मागील वर्षी कोरोनामुळे झालेली नुकसान भरून काढ़न्यासाठी या वर्षी तरी व्यवसाय जोरात होईल या आशेने व्यावसाइकानी मालाची साठवनुक केली.

परंतु शासनाने 5 एप्रिल पासून निर्बंधासहित लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सर्वसामान्य दुकानदार अनेक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे, दुकान बंद असले तरी दुकानात भरलेल्या सामानाचे देने, बैंकचे व्याज, किराया, लाइट बिल, कर्मचार्यान्चे पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घर खर्च व इतर खर्च चालूच आहे, त्यामुळे आर्थिक स्थिति डबघाइस आलेली आहे.

त्यामुळे सर्व व्यापारामधे असंतोष निर्माण होत असून शासनाविरुद्ध संघर्ष करण्याची मानसिकता तयार होत आहे, शासनाने ठरऊन दिलेल्या मार्गदर्शक नियमाचा अवलंबन करुण सर्व दुकानदाराणा सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 5 या मर्य्यादित वेळेत दुकान उघड़ंयाची परवानगी देण्यात यावी असी मागणी उपविभागीय अधिकारी चिमुर यांचे मार्फ़त मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे याणा दिलेल्या निवेदनात चिमुर व्यापारी संघटनेने केली आहे,निवेदन देते वेळी चिमुर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, संघटनेचे सचिव बबन बंनसोड़, उपाध्यक्ष श्याम बंग, दिलीप सातपुते, घनश्याम चांदेकर, नाना जोशी, योगेश ढोने, अंकुश जुमड़े, श्रीहरी सातपुते, राजू देसाई, रवि बावनकर, लल्ला असावा उपस्तित होते