कोरोणाच्या पार्श्वभूमीवर फुले – आंबेडकर जयंती घरोघरी प्रतिमा पुजन करून साजरी करावी – बापू गाडेकर

20

✒️आतिख शेख(विशेष प्रतिनिधी)

तलवाडा(दि.९एप्रिल):- सध्या महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात कोरोणा पॉझिटीव्ह रूग्ण संख्या दिवसागणिक वाढत असून हा धोका न पत्करता गेवराई तालुक्यात फुले – आंबेडकर या महामानवांवर मनापासून प्रेम करणा-या प्रत्येकाने समतेचे पाईक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी प्रतिमेचे पूजन करून साजरी करावी असे आवाहन अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष – बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

या देशात समतेचा विचार ख-या अर्थाने रूजविणारे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल तर दीनदलित, शोषित, पीडित लोकांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी देशभरात धुमधडाक्यात साजरी केली जाते. परंतु गेल्या वर्षापासून कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर महापुरूषांची जयंती खुलेआम साजरी करणे अवघड झाले आहे.

यावर्षी देखील कोरोणाची दुसरी लाट आल्यामुळे शासनाने कडक निर्बंध घातले असून गर्दी टाळण्यासाठी फुले – आंबेडकर प्रेमी नागरिक तसेच तरूण युवकांनी कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गाजावाजा न करता प्रत्येकाने आपापल्या परीने घरोघरी प्रतिमेचे पूजन करून साजरी करावी असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष – बापू गाडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.