आगीत घर जळाल्याने उघड्यावर आलेल्या शेतकरी कुटुंबास ‘भोलारमजी ‘ ची मदत

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.9एप्रिल):-रखरखत्या उन्हात लागलेल्या आगीत घर जळाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबीयास काहीतरी मदत मिळावी अशी कैफियत सखाराम बोबडे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या विनंतीवरून भोलारामजी कांकरिया संस्थेने शुक्रवारी त्या शेतकरी कुटुंबीय संसारोपयोगी साहित्याची मदत केली.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील कातकरवाडी येथील मंचक्र कातकडे यांच्या शेतातील राहत्या घरास आठ दिवसापूर्वी आग लागली. या आगीत त्यांचे घर व संसारोपयोगी साहित्य शेळी ,त्यांची दोन पिल्ले जळून खाक झाले. यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडलो होते. कोरोंना मुळे त्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन तक्रार करण्यासाठी वाहनेही मिळत नव्हती. ही बाब गावातीलच शिक्षक भगवान कातकडे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार,तथा धनगर सम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली.

सखाराम बोबडे यांनी त्यासाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला. पण आग लागलेल्या घटनेस शासकीय मदत मिळण्याचे परिपत्रक नसल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख सुनील चाफळे यांनी सांगितले. त्यानंतर बोबडे यांनी शेतकऱ्याला बोलावून घेत प्रत्यक्ष उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांच्या कार्यालयात जाऊन सर्व हकीगत सांगितली. कायद्याच्या चौकटीत बसून या शेतकऱ्यास मदत मिळणार नसल्याचे लक्षात येताच सुधीर पाटील यांनी भोळारमजी कांकरिया या सेवाभावी संस्थेच्या संचालिका मंजुषाताई दर्डा यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यास मदत करावी अशी विनंती केली.

गोदाकाठावर साकारण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंत या ठिकाणाहून शेतकऱ्याला मदत करण्यात आली. किराणा, अन्नधान्य ,भांडीकुंडी ,कपडे पांघरून अशी मदत करण्यात आली. यावेळी मंजु ताई दर्डा ,प्राचार्य कु पूजा दर्डा, सखाराम बोबडे, राहुल साबणे, हर्ष झोलकर, शेतकरी मंचक कातकडे, राम कातकडे आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED