“प्रशिक फाउंडेशन” ने साधेपणाने साजरी केली राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12एप्रिल):-कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्याधिकारी यांनी नियमावली आखून दिली आहे त्या नियमांना अधीन राहून “प्रशिक फौंडेशन सामाजिक संस्था दहिवडी” या संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करणेत आले.प्रशिक फौंडेशन ही संस्था जामाजीक बांधिलकी नेहमीच जप्त आली आहे आजवर या संस्थेने अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले,महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केलेल्या आहेत.महापुरुष महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेस बापूराव शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करणेत आला.

संजयकुमार खरात सर यांनी महापुरुषाविषयी मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे यांनी महात्मा जोतीबा फुले यांच्या संपूर्ण कार्याची माहीती दिली कार्यक्रम प्रसंगी बापूराव शिंदे,बादल शिदे,देवा देवकुळे,आबा जाधव ,शितल शिंदे (मॅडम),लिना शिदे,यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे नियोजन गणेश नवगण,क्षितीज काशिद यांनी केले