आ. डॉ. रत्नाकर गुट्टे साहेबांनी मा. उपजिल्हाधिकारी परभणी यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन आमरण उपोषण सोडले

23

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(प्रतिनिधी):-गंगाखेड विधानसभामतदारसंघात लोक कल्याणकारी विविध मागण्याकरिता, आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचे “जिल्हाधिकारी कार्यालय परभणी” येथे आमरण उपोषण सुरू होते.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संबंधित सर्व विभागाच्या प्रमुखांनी सदरील मागण्या बाबतीत लेखी आश्वासन दिल्यानंतर व मा. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या विनंतीस मान देऊन, उपजिल्हाधिकारी मा. संजय कुंडेटकर यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब यांच्यासह शंभूदेव मुंडे, नितीन खोडवे, शेख खालीद यांनी आमरण उपोषण सोडले…!