सत्तरमाळ येथे दोन सख्या भावाचा कोरोनाने निधन

21

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12एप्रिल):- तालुक्यातील सत्तरमाळ येथील फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीतील भारिप बहुजन महासंघाचे माजी पुसद तालुकाध्यक्ष तसेच हनवतखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आयुष्यमान सखाराम मारोती पंडित यांना मागील पंधरा वीस दिवसापासून कोरोना या आजाराची लागण झाली होती. ते यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय येथे भरती होते . उपचार सुरू असताना आज दि.12/4/2021 रोज सोमवार दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाले आहे.

त्याचबरोबर त्यांची लहान भाऊ अंबादास मारोती पंडित (शिक्षक) यांना मागील एक महिन्यापासून कोरोनाची लागण झाली होती ते अकोला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती होते .त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दि.12/4/2021 रोज सोमवार सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले .

दोन सख्ख्या भावाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने सत्तरमाळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .सखाराम मारोती पंडित यांच्या मागे पत्नी ,तीन मुली, दोन मुले ,तीन भाऊ असा आप्त परिवार आहे .

अंबादास मारोती पंडित यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.