डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने गुन्हे दाखल करीत आसाल तर आम्ही असे गुन्हे वारंवार करणार – नगरसेवक सत्यपाल साळवे

22

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15एप्रिल):-प्रशासनाला सहकार्य करून जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून आनंद साजरी करणाऱ्या वर गुन्हे दाखल केले जात असतील तर भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी प्रशासनास सहकार्य करणार की नाही याची शाश्वती नाही 2020 गतवर्षी आम्ही प्रशासनाला सहकार्य केले याही वर्षी आम्ही सहकार्य करून जयंती साजरी केली. शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करीत आम्ही मिरवणूकही काढली नाही.

सोशल डिस्टंसिंग राखून अभिवादन केले शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत फक्त मिरवणूक न काढता जागेवरच आम्ही दोन साऊंड लावून आमचे सहकारी यांच्यासोबत आनंदात साजरी करत असताना जर पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करीत असेल तर येणाऱ्या प्रत्येक जयंती मध्ये प्रशासनाने नियम न पाळता गावागावात मिरवणुका काढून गुन्हे दाखल होतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केल्यामुळे जर गुन्हे दाखल होत असतील तर अशे कितीही गुन्हे घ्यायला मी तयार आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यास मागे हटणार नाहीत.असे नगरसेवक सत्यपाल साळवे यांना फोनवरून संपर्क केला आसता त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.