केंद्र सरकार कडे बोट दाखवून महाविकास आघाडी सरकार स्वतःचे अपयश लपवू शकत नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.19एप्रिल):- रेमडेसीविर सह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही.राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू शकत नाही असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला.

कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे.त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असे आवाहनही ना. रामदास आठवले यांनी आज मुंबईत केले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे.देशात कोरोना चा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत.सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ; राज्यपालांशी संवाद साधत आहे.महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये.केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन; रेमडेसीवर सह सर्व औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करण्यात येत आहे.राज्य सरकार ने कोरोना च्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकार वर करू नये असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे.कोरोना च्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे.मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे असा आरोप ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत केला.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED