दिव्यांग निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ आर्थिक मदत द्या- शुभम बेद्रे

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.20एप्रिल):-ब्रेक द चैन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यात कडक निर्बंध घातलेले असल्याने दिव्यांग, निराधार व नोंदणीकृत बांधकाम कामगार व नोंदणीकृत रिक्षाचालक कोरोना काळात हवालदिल झाल्याने व तसेच कोरोना संकट काळात त्यांना कोणतेही काम मिळत नसल्याने दिव्यांगा सह इतर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तसेच दिव्यांग,निराधार व कामगारांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची घोषणा लॉकडाऊन पूर्वी ठाकरे सरकारने केली आहे. त्या अंतर्गत दिव्यांग, निराधार वयोवृद्धांना प्रत्येकी व्यक्तीला एक हजार रुपये, तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व नोंदणीकृत रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.

पण ती आर्थिक मदत लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करावी जेणेकरून लॉकडाउन संकट काळात दिव्यांग व कामगारांना आर्थिक मदतीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी. जेणेकरून दिव्यांग व्यक्ती व कामगारांना काही प्रमाणात का होईना कोरोना संकट काळात जीवन जगण्या थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांना आर्थिक मदत होईल, असे मत रयत शेतकरी संघटना उपजिल्हाप्रमुख शुभम पाटिल बेद्रे यांनी व्यक्त केली आहे.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED