उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून कोविड केंन्द्राचे उद्धाटन

26
✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

हिंगणघाट(दि.22एप्रिल):-कोरोना प्रादुर्भाव दुसऱ्या लाटेचा थैमान रोखण्यासाठी तसेच शासनाकडे उपलब्ध आरोग्य सेवेत पोलीस दलाच्या कर्मचारी वर्गाचा भार वाढु नये , त्याचप्रमाणे पोलिस दलाचा कोरोना विषाणु पासुन बचाव करण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी दिनेश कदम यांची संकल्पनेतून कोविड केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.पोलीस दलाचे करोना प्रादुर्भावापासुन संरक्षण व्हावे यासाठी २२ खाटांचे सुसज्ज असे कोविड केन्द्र महाराष्ट्र हाउसिंग प्राधिकरण ‘म्हाडा’काॅलोनी पिंपळगाव रोड येथे उभारण्यात आले आहे. प्राथमिक स्वरुपाचे ऑक्सीजनयुक्त व्यवस्थेसह केंद्र सुरू करण्यात आले आहे याठिकाणी डॉ वरभे हे विनामानधन सेवा देणार आहे.

येथे स्टाफसह आरोग्य सेवक सेविकासह, सर्व सुसज्जित व्यवस्था आहे हे विशेष या कोविड केंन्द्राचे उद्धघटन आज दि २१ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांचे हस्ते झाले,या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत मुख्य अधिकारी अनिल जगताप आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित होती हिंगणघाट वडनेरे, अल्लिपुर ,समद्रपुर ,गिरड या सर्व पोलीस स्टेशन मधिल पोलीस विभागचे अधिकारी व कर्मचारी वर्गाला याप्रसंगी कोविड विषयक फेससिड देण्यात आले .