चांदवड DCHC बाबत वैद्यकीय अधिक्षकांचा निवेदनद्वारे खुलासा

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.22एप्रिल):-चां दवड DCHC येथील व्हायरल व्हिडिओ संदर्भात घटनाक्रमनुसार खुलासा वैद्यकीय अधीक्षक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना सादर केलेला आहे.चांदवड उपजिल्हा रुग्णालय परिसरातील cctv फुटेजनुसार व्हिडिओ मध्ये दिसणारा तरुण अरुण उत्तम माळी वय 30 रा खंगळवाडी हा दुपारी 2.51 मिनिटांनी खाजगी वाहनातून DCHC सेंटर परिसरात दाखल झाला.2.53 ला तपासणी कक्षात बसवले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.2.55 मीनिटांनी डॉ सोनवणे यांनी pulse oximiter वर oxygen saturation घेण्याचा प्रयत्न केला.

मोठया pulse oximeter वर oxygen saturation 30 ते 35 % दरम्यान असल्याचे निदर्शनास आले आहे.ऍडमिट stable रुग्णापैकी ज्या रुग्णास oxygen आवश्यकता नाही त्याला बाजूला सारून या रुग्णास बेड देऊन टेटमेन्ट करण्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित डॉ यांना सांगितले.डॉ बेड ऍडजस्ट करत असताना रुग्ण कोसळला असल्याचे खुलाश्यात म्हटले आहे.तरी व्हायरल व्हिडिओ मध्येडॉक्टर कर्मचारी अथवा स्ट्रेचर नसल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केलेल्या निवेदनद्वारे खुलाश्यात म्हटले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED