हणेगाव येथील डॉक्टर झाले गोरगरीबांचे देव

38

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो.नं.९४०४६४२४१७.

हणेगाव(दि.25एप्रिल):-सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णांनी तपासणी करण्यास उशीर करत असल्यामुळे संसर्ग होऊन रुग्ण वाढण्याचा गंभीर धोका निर्माण होतो.त्यासाठी लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी तात्काळ प्रथमोपचार घ्यावे. डॉ.आनंद चिद्रावार हणेगावकर.

हणेगाव (दि.२५) गेल्या एक वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून जणूकाही जग नष्ट करण्याच्या विचाराने थैमान रुपी तांडव माजवला असून यामुळे संपूर्ण मानव जात भयभीत झाली आहे. प्रत्येक माणसाला आपला मृत्यू समोर दिसत आहे,असेच वाटायला लागली. यामध्ये कोरोना चक्राला रोखण्याचे काम येथील आरोग्य सैनिक करत असून आपले जीव मुठीत धरून आज संपूर्ण जगातील व भारतातील डॉक्टर या कोरोनाला हरवण्यासाठी रात्रंदिवस संशोधनाच्या माध्यमातून कोरोनाला नामोहरम करण्याचे ठरविले असेच म्हणावे लागेल. आज राज्यामध्ये कोरोनामुळे संपूर्ण मानव जातीचे जनजीवन ठप्प झाले असून पूर्ण संसाराची घडी विस्कळीत झाली आहे. आज प्रत्येक जण अर्थ चक्रामध्ये सापडला असून महाराष्ट्रामध्ये याच कारणामुळे पूर्ण राज्यभर कहर माजवला आहे तर संपूर्ण राज्य हाहाकार माजली असून लहानापासून मोठ्यापर्यंत कोरोनाची भीती सतावत आहे.

आज नांदेड जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल क्रमांकावर गेला असून याठिकाणी कोरोना पूर्ण थैमान माजविले आहे आणि पूर्ण थैमान माजले आहे. अशा मध्ये डॉक्टर हा देवरूपी कार्य करत असून प्रत्येक डॉक्टर आपले प्राण पणाला लावून जिवाची पर्वा न करता तो रुग्णाची सेवा करताना दिसतो आहे. आज हणेगाव आरोग्यकेंद्र अंतर्गत 40 ते 45 गाव ,वाडी ,तांडे ,असून हणेगाव याठिकाणी दवाखान्याची सोय असल्यामुळे हणेगाव येथे असलेल्या चिद्रावार क्लिनिक, माऊली क्लिनिक ,मातोश्री क्लिनिक ,मल्लिकार्जून क्लिनिक ,असल्यामुळे या विभागातील कोरोनाच्या भीतीने डॉक्टरकडे सर्दी ताप खोकला अशा आजाराचे रुग्ण व इतर आजारांचे रुग्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असून यावेळी डॉक्टर आपले जीव धोक्यात घालून या रुग्णांवर उपचार करत आहेत व सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णाला तपासणी चा सल्ला देत आहेत. मात्र रुग्ण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

यामुळे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे डॉक्टर आनंद चिद्रावार यांनी आपले मत व्यक्त केले तर डॉक्टर सूर्यकांत नाईक सांगतात प्रत्येक रुग्णाने कोरोनाची तपासणी करून घ्यावी असे सुचवताना दिसत आहेत. यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका किंवा कोरणा संसर्ग होण्याची भीती सांगितली याठिकाणी असलेल्या चिद्रावार क्लिनिक चे डॉक्टर आनंद चिद्रावार व माऊली क्लिनिक डॉक्टर सूर्यकांत नाईक मातोश्री क्लिनिक डॉक्टर धुमाळे आरुष क्लिनिकचे डॉक्टर ज्ञानेश शेरिकर मल्लिकार्जुन क्लीनिक डॉक्टर वझरकर डॉक्टर व्यंकट पाटील हे सर्व डॉक्टर आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना सर्दी ताप खोकला इतर आजार असतील तर त्वरित तपासणी करावी व कोरोना प्रतिबंधक लस, सर्वांनी घ्यावी असा सल्ला सर्वांना देताना दिसून येत अस आहेत आज समाजामध्ये आज घडीला यांच्याविषयी सदभावना व्यक्त होताना दिसत आहे.