कोरोना काळात किराणा माल जास्त दरात विकणाऱ्या दुकानदार व तेल एजन्सीज वर गुन्हे दाखल करा

22

🔸सहासिक जनशक्ती संघटनेची मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.26एप्रिल):-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता राज्यशासनाने दि,१४ एप्रिल पासुन १ मे पर्यंत राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.याचा गैरफायदा घेत किराणा दुकानदार व खाद्यतेल विक्री करणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांनी जास्तीचे दर आकारुन ग्राहकांची सर्रास आर्थिक लुट करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेलासह साखर,गुळ,दाळ अश्या अनेक वस्तुंचे भावदेखील वाढवून ग्राहकांना वेठीस धरले आहे.प्रशासनातील अधिकारी मात्र यावेळी मुग गिळून चुप बसल्याचे दिसुन येत आहे.
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसलेल्या गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू जास्त दराने विकल्या जात आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी किराणा मालाचे भाव जाहिर केल्यानुसार साखर ३५ रु. किलो ,गुळ ४५ रु.किलो, हरभरा डाळ ६० रु.किलो ,शेंगदाने १००रु किलो , तेल ९५ रुपये किलो, तुरदाळ ९० रु ‌किलो , देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु आज किराणा व तेलासारख्या जीवनावश्यक वस्तु चढ़या दराने विक्री करण्यात येत आहे. मोठे दुकानदार साठा करुन भाववाढ करुन कीरकोळ दुकानदारांना जास्त किंमतीत माल पुरवठा करीत असल्याने किरकोळ किराणा विक्रेतेसुद्धा जादा भाव घेऊन विक्रि करीत आहे. उपरोक्त भाववाढ करुन गोरगरीब जनतेला वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष यांनी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत व तहसीलदार श्रीरामं मुधंडा यांना निवेदनाद्वारे केली आहे ,