कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्धांचा सन्मान

20

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.28एप्रिल):- प्रेस संपादक व पत्रकार संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्धांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

समीर भाई मित्र मंडळ यांच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास हॅप्पी क्लबच्या पुढाकाराने सर्व धर्माच्या कोरोना बाधित रुग्णांचा निशुल्क अंत्यसंस्कार करीत असल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या सहकाऱ्यांने धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सोहन माच्छरे यांच्या हस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व माजी नगरसेवक श्री.समीरभाई यांच्या उपस्थितीत टीममधील या निस्वार्थी निशुल्क, हिंमतबाज, कोरोनाला न घाबरता सेवा करणाऱ्या या कोविड योद्धांना गौरविण्यात आले.

यावेळी छोटू पाटील (मराठा सेवा संघ), शेख एजाज, शेख अन्सार, शेख कलीम, ताजुद्दीन, सिंकदर, भगवान कांबळे (पत्रकार ) नविद अहेमद (टिपू सुलतान ब्रिगेड) यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.