लॉकडाउन काळात गावातील मजूर व बैल बंडी धारकाना ग्रामपंचायतीचा दिलासा

26

🔹खांबाडा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28एप्रिल):-कोरोना संकट काळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून गावातील नाल्यांतील गाळ उपसन्याचे काम 80 मजूर व गाळ वाहतूकचे 25 बैलबंडी धारकांना काम दिले,खऱ्या अर्थाने लॉकडाउन काळात गावातील मजूर व बैल बंडी धारकाना ग्रामपंचायतीचा दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेल्या गोंदेडा च्या मार्गावर खांबाडा गाव असून या गावातील नाल्या उपसा व वाहतूक करण्याचे काम चक्क ट्रॅक्टर न लावता गावातील नागरिकांना दिला आणि कोरोना लॉकडाऊन च्या संकट काळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून रोजगार देण्याचा अभिनव उपक्रम ग्राम पंचायत खांबाडाचे सरपंच काजल ननावरे ,उपसरपंच मंगेश धाडसे, अमोल गजभे , सुनील कडवे, यांनी राबविले आहे .

आजच्या स्थितीत कमिशन, टक्केवारी, भ्रष्टाचार असे प्रकार सुद्धा नाली उपसा ,वाहतूक करण्यात होत असते संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्या संगनमताने प्रकार घडत असतात परंतु ग्राम पंचायत कमिटी ने मात्र कमिशन भ्रष्टाचार ला फाटा देत गावकऱ्यांना रोजगार देण्याचा पायंडा पुढे ठेवला आहे.
मागील एक वर्षा पासून जगात, देशात ,राज्यात व जिल्ह्यात कोरोना संकट कोसळले असल्याने लॉक डाऊन करण्यात आले असल्याने मजूर वर्ग मजुरी पासून वंचित राहून त्यांच्या आर्थिक बाजू कमकुवत होत होती.

सद्या शेती हंगाम नसल्याने कोणतेही काम नव्हते तेव्हा सरपंच काजल ननावरे, उपसरपंच मंगेश धाडसे ,सुनील कडवे,अमोल गजभे व इतर सदस्यांनी गाळ उपसा व वाहतूक दुसऱ्या गावातील ट्रॅक्टर किंवा मजुरांना किंवा ठेकेदार यांना न देता गावातील 80 मजूर लावून नाल्या गाळ उपसा व २५ बैलबंडी ने गाळ वाहतूक करण्याचा निर्णय घेत गावातील नागरिकांना रोजगार मिळाला. शेती हंगाम नसल्याने बैलबंडी मालकास सुद्धा रोजगार मिळाला.

नाल्या गाळ उपसा करण्यासाठी 80 मजूर व गावातील 25 बैलबंडी गाळ वाहतुकीसाठी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे काही कालावधी करीता त्यांच्या रोजगाराची समस्या मिटन्यास मदत झालेली आहे.