लाॕकडाऊनमुळे गावी पायी जाणाऱ्या मजुरांचे हाल

✒️बोरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बोरी(दि.28एप्रिल):-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लाॕकडाऊन सुरू आहे. त्यातच हाताला काम आणी पोटाला रोटी मिळत नसल्याने रस्त्याने अनेक मजुर लोक आपापल्या घरी पायी परतत असतानाचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसुन येत आहे.सध्या राज्यामध्ये सर्वत्र कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे.ग्रामीण भागातील शेतीची कामे तसेच बांधकाम आदी कामे ठप्प झाली आहेत.

त्यामुळे त्या कामांवरती अवलंबून असणारे मजुर हाताला काम नसल्यामुळे आपापल्या घरी पायी परतत असताना चित्र तालुक्यात दिसत आहेत. रस्त्यावरुन वाहने चालु असुन सुद्धा या मजुरांना एकही वाहन चालक कोरोनाच्या भितीने वाहनांमध्ये घेत नाहीत.तसेच एस.टी.बसही बंद असल्यामुळे या पायी जाणा-या मजुरांचे हाल होत आहेत.घरी जाण्यासाठी त्यांना दहा/बारा, तर काहींना दिवस लागत आहेत.कसेबसे आताच हाताला काम मिळालेले मजुर निराश होऊन घरी परतत आहेत.सततच्या लाॅकडाऊनमुळे हे मजुर त्रस्त झाले असुन त्यामुळे ‘आपला गावच बरा’ अशी म्हणण्याची वेळ या मजुरांवर आली आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED