कोरोनामुळे धास्तावलेल्या जनतेसाठी आम आदमी पार्टी ची ‘कोरोना रुग्णमित्र’ सेवेची सुरुवात

🔸चोवीस तास फोनवर मिळणार कोरोना रुग्ण व परिवारातील लोकांना तज्ञांचे मार्गदर्शन व मदत

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28एप्रिल):-कोरोना महामारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे सगळीकडे भीतीचे सावट दाटल्या गेले आहे. कोरोनाचा उद्रेक हा फक्त शहरी भागापुरताच मर्यादित राहील हा भ्रम पूर्णतः फुटलेला असून ग्रामीण भागातही कोरोनाचा भयानक उद्रेक जाणवत आहे. स्थानिक नेत्यांनी आरोग्य व्यवस्थेकडे कधीच लक्ष दिले नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडलेली आहे. अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन, बेड, औषधी मिळू शकत नसल्यामुळे मृत्युदर वाढलेला आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून कोरोनामुळे धास्तावलेल्या जनतेसाठी आम आदमी पार्टी तर्फे ‘कोरोना रुग्णमित्र’ सेवेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्रातून या सेवेची सुरुवात करण्यात येत असून जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर चोवीस तास कोरोना रुग्ण व त्यांच्या परिवारातील लोकांना तज्ञांचे मार्गदर्शन व मदत करण्यात येत आहे. याअंतर्गत वैद्यकीय, औषध-तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, आहार तज्ञ अश्या लोकांच्या चमूतर्फे डब्लू. एच. ओ., भारत सरकार तसेच आय. सी. एम. आर. ने जाहीर केलेल्या धोरणानुसार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेजारी किंवा परिवारातील कोणत्याही सदस्याला काही लक्षणे आढळल्यास आपतर्फे जाहीर केलेल्या ९५०३०५६३५३, ९२८४८४९८९६, ९४२३६२३७६७ या क्रमांकावर संपर्क करावा.

आम आदमी पार्टी च्या या नाविन्यपूर्ण प्रयत्नामुळे जनमानसात कोरोनाची भीती कमी होऊन त्वरित ईलाज मिळण्यास मदत होईल अशी आशा आहे असे आम आदमी पार्टी चे चिमूर-नागभीड विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी सांगितले. आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री सुनीलजी मुसळे, सचिव श्री संतोष दोरखंडे, भिवराज सोनी यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी आप चे स्वयंसेवक विशाल इंदोरकर, मंगेश शेंडे, आदित्य पिसे, विलास दिघोरे, अतुल खोब्रागडे, निरंजन बोरकर, विशाल बारस्कर, समिधा भैसारे, ज्योती बावनकर, वंदना घोनमोडे इत्यादी प्रयत्नरत आहेत

महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED