जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत शिक्षक भारतीचे ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि.29एप्रिल):- कोरोनाची दुसरी लाट प्रचंड आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी नकोत ही मागणी आता जोर धरत आहे.या आशयाची मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे पत्रान्वये केली आहे.

बदल्या ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असोत यात राजकारण तरी होत नाही नाहीतर भ्रष्टाचार तरी होतो विद्यार्थी आणि शिक्षकांचे हित पाहिजे असेल तर शिक्षकांच्या बदल्या विनंती शिवाय केल्या जाऊ नयेत तसेच शिक्षकांना नेमणूक देत असताना त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यात देण्यात यावी व असे करताना विद्यार्थ्यांना त्यांची स्थानिक भाषा अवगत असलेले शिक्षक मिळण्याचा अधिकार शाबूत ठेवावा.वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या बदलांमुळे अनेक शिक्षक तणावाखाली आहेत शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज ही-मानस प्रक्रिया असते बदलीची टांगती तलवार सतत माथ्यावर लटकवलेली असल्यामुळे शिक्षकांची मानसिकता बिघडते त्यांच्या आधी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने विद्यार्थ्यांवर अन्याय होतो त्यामुळे या बदली धोरणाच्या आज साकल्याने विचार करणे आवश्यक आहे.

त्यामुळे कृपया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा बदल्या करताना पुढील मागण्यांबाबत विचार व्हावा अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवलेल्या पत्रात आमदार पाटील यांनी पुढील मागण्या केल्या आहेत. कृपा करून विनंती शिवाय इतर कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशासकीय बदल्या करू नयेत, विद्यार्थ्यांना त्यांची स्थानिक भाषा अवगत असलेले शिक्षक मिळण्याच्या कायद्याने दिलेला अधिकार साबुत ठेवावा (RTE Geographical and linguistic disadvantage group). ,जिल्हा अंतर्गत बदल्याही विद्यार्थी, शिक्षकांच्या गैरसोय नुसार आणि शिक्षकांच्या विनंती नुसार करण्यात याव्यात, रॅण्डम राऊंड व विस्थापित झालेले तसेच दुर्गम भागातील शिक्षकांवरील अन्याय दूर करावा त्यांना त्यांच्या विनंतीनुसार बदली द्यावी.

पती-पत्नी एकत्रीकरणा नुसार विनंती बदल्या कराव्यात, महिला शिक्षकांची विनंती प्राधान्याने मान्य करावी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे तातडीने भरावीत,पदोन्नतीची रखडलेली प्रक्रिया गतिमान करावी आदी मागण्या करण्यात आल्याचे शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,रविंद्र उरकुडे,धनराज गेडाम,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,विरेनकुमार खोब्रागडे,रावन शेरकुरे,डाकेश्वर कामडी,विलास फलके,शेषराव येरमे,क्रिष्णा बावणे,राजेश धोंगडे,तेजेंद्र उईके,हिरोजकुमार भोयर,रंजना तडस,माधुरी पोंगळे,निर्मला सोनवने आदींनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED