संत निरकारी मंडळाच्या वतीने कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना ‘फ्री टिफिन’ सेवा सुरू

22
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.1मे):-संत निरंकारी मंडळाच्या सातारा झोनच्या वतीने तसेच झोनल इंचार्ज प.पु.नंदकुमार झांबरेजी(दादा)यांच्या संकल्पनेतून या कोरोनासारख्या महामारीत एकाही रुग्णांचे नातेवाईक व रुग्ण अन्नाविना राहणार नाहीत यासाठी त्यांनी ‘फ्री टिफीन’ सेवा सुरू केली आहे.तरी ज्यांना जेवणाची गरज लागेल त्यांनी ज्या त्या ब्रँचनुसार हेल्पलाईन नंबरवर फोन करावा असे आवाहन प.पु झांबरेजी यांनी केले आहे.संत निरंकारी मंडळ हे स्वच्छता अभियान,महामारी,वृक्षारोपण,रक्तदाना सारख्या शिबिरात नेहमीच अग्रेसर असते.

त्यात कोरोना रुग्णांना हॉस्पिटल,बेड,अॉक्सिजन,व्हेंटीलेटर,इंजेक्शनसह लागेल ती मदत मंडळाचे सेवादल,स्वयंसेवक स्वतः हिरीरीने सहभागी होऊन तो प्रश्न मार्गी लावत आहेत.सदर मंडळाने कोरोनासाठी राज्यासह केंद्र शासनाला आर्थिक मदत केली आहे.
निरकारी मंडळाचे स्वच्छता अभियान,रक्तदानासह सामाजिक कामातील योगदान आणि आत्ता रुग्ण आणि नातेवाईक यांनी सुरु केलेली ‘फ्री टिफिन’ सेवा पाहता माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृह दहिवडी येथे झालेल्या बैठकीत दहिवडी सेक्टर संयोजक प.पु.प्रमोद जगतापयांना छ.शिवाजी मेडीकल कॉलेज व कोवीड सेंटर मायणी व जिल्हयातील इतर ठिकाणी मंडळाच्या महात्म्यांना बेडसह इतर गोष्टींमध्ये सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी दहिवडी सेकटर संयोजक जगताप यांनी सर्व रुगणाचे नातेवाईकांना आवाहन केले आहे की संत निरकारी मंडळाकडून सुरु केलेल्या ‘फ्री टिफिन’ सेवेचा जास्तीत जास्त रुगणाच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा.