कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नातून कोवीड सेंटर उभारावे

23

🔹सहकार सरचिटनीस मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्यी मागणी

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगांव(दि.1मे):- जगभरात मागील वर्षीपासून कोरोना या महामारीने थैमान घातले आहे, या रोगामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागले तसेच अनेकांनी आपल्या घरातील व्यक्तीला, जीवाभावाच्या व्यक्तीला, नातेवाईकाला कोरोना रोगामुळे गमावले आहे तरी कोरोना रोगावर नियंत्रण ठेवण्याकरीता नागरीकांनी स्वतः दक्षता घेतली पाहिजे तसेच इतरांनाही दक्षता घेण्यास प्रवृत्त करून शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे तरच अनेकांचे प्राण वाचू शकतील व आपण कोरोना रोगावर मात करू शकू . ज्या कोरोना रूग्णाला ऑक्सीजनची आवश्यकता आहे त्याला तो तात्काळ मिळण्यासाठी तालुक्यात ऑक्सीजन प्लान्टची युध्दस्तरावर उभारणी करणे गरजेचे आहे.

त्याच प्रमाणे खामगांव शहरातील कोविड सेंटरमध्ये जळगांव जामोद, नांदुरा, संग्रामपूर आदी घाटाखालील भागातील रूग्णांना उपचारार्थ पाठविले जात असल्यामुळे खामगाव तालुक्याच्या ठिकाणी जास्त संख्येने ऑक्सीजन सुसज्ज असलेले किमान 100 बेड तसेच अनुभवी स्टाफ तसेच कोरोना रू ग्णांवर उपचार करण्याकरीता लागणारे रेमडिसिवर इंजेक्शन सह इतर लागणार्‍या वस्तु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण उत्पन्नापैकी किमान 25 टक्के रक्कम वापरून युद्ध स्तरावर सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेले कोविड सेंटर त्वरित उभारण्यात यावे या मुळे कोरोना रुग्णांना उपचारास खूप मोठी मदत होऊन खाजगी दवाखान्यात होणारी लूट पण थांबेल तसेच शासकीय रुग्णालयावर येणारा ताण सुद्धा कमी होईल अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिगंणे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन सहकार चिटनीस मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांनी केली