चंद्रपूर जिल्ह्यात (दि.3मे) रोजी 24 तासात 993 कोरोनामुक्त, 973 कोरोना पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू आतापर्यंत 46,125 जणांची कोरोनावर मात

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 993 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 973 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 63 हजार 868 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 46 हजार 125 झाली आहे. सध्या 16 हजार 767 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 87 हजार 23 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 18 हजार 795 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 52 वर्षीय महिला, बालाजी वार्ड येथील 58 वर्षीय पुरुष, एकोरी वार्ड येथील 55 वर्षीय महिला, भिवापुर वार्ड येथील 52 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 60 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 61 वर्षीय पुरुष, नगीना बाग येथील 51 वर्षीय महिला. ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील 65 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील वाढोना येथील 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, मंगरूळ येथील 60 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील 50 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील माजरी येथील 46 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 72 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील केळझर येथील 70 वर्षीय पुरुष,
वणी-यवतमाळ येथील 57 वर्षीय पुरुष. भंडारा तालुक्यातील साकोली येथील 40 वर्षीय महिला. गडचिरोली येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 976 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 904, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 29, यवतमाळ 28, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 973 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 390, चंद्रपूर तालुका 38, बल्लारपूर 81, भद्रावती 99, ब्रम्हपुरी 41, नागभिड 38, सिंदेवाही 25 , मूल 57, सावली 33, पोंभूर्णा 13, गोंडपिपरी 30, राजूरा 05, चिमूर 06, वरोरा 72, कोरपना 17, जिवती 10 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 559 कोरोनामुक्त, 11 मृत्यूसह आज(3 मे) 239 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.3मे):- आज जिल्हयात 239 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 22496 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 17662 वर पोहचली. तसेच सद्या 4386 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 448 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये 48 वर्षीय महिला मोहरली ता.मुलचेरा, 52 वर्षीय पुरुष मोहली ता.धानोरा , 65 वर्षीय महिला कनेरी गडचिरोली , 69 वर्षीय पुरुष नान्ही ता.कुरखेडा, 46 वर्षीय पुरुष वासाडा ता.आरमोरी , 70 वर्षीय महिला धानोरा, 65 वर्षीय महिला गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष विसोरा ता.वडसा , 26 वर्षीय महिला आरमोरी, 48 वर्षीय पुरुष वडसा, 65 वर्षीय महिला कोरची यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.50 टक्के तर मृत्यू दर 1.99 टक्के झाला.

नवीन 239 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 127, अहेरी तालुक्यातील 13, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 2, चामोर्शी तालुक्यातील 14, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 4, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 4, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 37 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 12 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 559 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 175, अहेरी 51, आरमोरी 24, भामरागड 29, चामोर्शी 40, धानोरा 25, एटापल्ली 31, मुलचेरा 12, सिरोंचा 14, कोरची 29, कुरखेडा 48, तसेच वडसा येथील 81 जणांचा समावेश आहे.