आपल्या DVP मल्टिप्लेक्स मध्ये ❝ DVP मल्टीस्पेशालिटी कोविड सेंटर ❞ चे उदघाटन ‘रूग्णाची सेवा करणा-या परिचारिकेच्या’ हस्ते करण्यात आले

104

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

पंढरपुर(दि.3मे):-महाराष्ट्रसह राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने हाहाकार माजवला असताना दररोज हजारो रुग्ण सोलापूर जिल्ह्यासह प्रामुख्याने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात दिसत आहे. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडत असताना रुग्णांसाठी रुग्णालयांची व खाटाची कमतरता भासत आहे.

पंढरपूरात प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. पंढरपूरमध्ये रुग्णांच्या संख्येच्या मानाने खाटांचे उपलब्ध नसल्याने आम्ही रुग्णसेवेत आपला खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला.

आपल्या सेंटरमध्ये जवळपास 30 ऑक्सिजन खाट तर 20 विलीनीकरणासाठी खाटाची सोय केली आहे. या सेंटरमध्ये MD, MBBS, BAMS, नर्स, सिस्टर, मेडिकल, लॅब उपलब्ध असून 24 तास रूग्णांची सेवा देण्यासाठी हे आज खुलं केले आहे. कोविड सेंटरची उभारणी करून रूग्णांना चांगल्याप्रकारची सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील.

यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री.सचिन ढोले, वैद्यकीय अधीक्षक डाॅ.श्री.गिराम, आरोग्य अधिकारी डाॅ.श्री.एकनाथ बोधले, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमर पाटील, डाॅ.श्री.श्रीराज काणे, डाॅ.श्री. प्रशांत निकम, डाॅ.श्री. पाचकवडे, संचालक श्री.संतोष कांबळे, श्री.विश्वंभर पाटील, नगरसेवक श्री.श्रीनिवास बोरगावकर,श्री.महादेव तळेकरसर आदी उपस्थित होते.