खा.रंजीतसिह नाईक निबाळकर आणि आ.जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सुरु होणार म्हसवड येथे “कोविडं सेंटर”

27

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो;-9075686100

माण(दि.4मे):-तालुक्यात गेले कित्येक दिवसापासून कोरोनाने हाहाकार माजविला असून रुग्ण संख्या वाढ आणि मृत्यूचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे याची दखल घेत माढा लोकसभेचे खासदार रंजीतसिह नाईक निबाळकर आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून म्हसवड येथे लवकरच “कोविडं सेंटर” सुरु होत आहे.
मा. आ.जयकुमार गोरे भाऊ व खा.रणजीतसिह निंबाळकर यांच्या संकल्पनेतून म्हसवड येथे सुरू होत असलेल्या कोविड सेंटरचे आज प्रत्यक्षात काम सुरू झाले , यावेळी म्हसवड मधील सुप्रसिद्ध डॉ.दोलताडे यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या व पूर्ण सहकार्य करत असण्याबाबत मत मांडले.

यावेळी नगरसेवक अकिल काझी , भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, मा. सरपंच रामभाऊ नरळे,श्री गणेश केसकर उपस्थित होते.येत्या चार ते पाच दिवसांत १०० बेड(आयसोलाशन ५० बेड, ऑक्सिजन ५० बेड ) असणार हे सुसज्य हॉस्पिटल म्हसवड व म्हसवड परिसरातील लोकांच्या सेवेत ,शासनाचा कोणताही मोबदला न घेता, अन्नदानासाहित ,रुग्णाचा एकही रुपया न घेता पूर्णपणे मोफत होनार आहे .