सावंगी (झाडे) येथील मृत महिला व तिची मुलगी हे अव्यवस्थेचे बळी-अनिल जवादे( विदर्भ विकास आघाडी)

36

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.6मे):- सावंगी झाडे येथील महिला सुभद्रा डोमाजी मांडवकर व तिची मुलगी सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे या दोघी त्यांच्या कुटुंबियां सोबतच बाजूच्या रूममध्ये वेगळ्या राहत होत्या .त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक बाहेर गावाला गेले होते. फक्त एक महिलाच घरी होती. त्यामुळे कोणालाही सदर दोन्ही महिलांच्या मृत्यू बद्दल माहिती झाली नाही. जेव्हा त्या मृतदेहांची दुर्गंधी पसरली तेव्हा बाजूला राहणाऱ्या महिलेने आत डोकावून पाहिले हालचाल दिसत नाही. सदर महिलेने गावकऱ्यांना बोलावले व कुटुंबीयांना सुद्धा याची माहिती दिली असता दोघीही मृतावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर गावचे पोलीस पाटील व सरपंच यांनी पोलिसांना माहिती दिली. एका छोट्याशा गावांमध्ये मन सुन्न करणारी घटना दोन महिला तीन दिवस घरातच मरून राहणे असे का घडले असावे ?

विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी सहकाऱ्यांसोबत जेव्हा सावंगी (झाडे )येथे भेट देऊन माहिती घेतली असता गावकऱ्यांनी सांगितले की मृत दोन्ही मायलेकी मृत्यूहोण्यापूर्वी तीन-चार दिवसा आगोदर उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोना टेस्ट (RTPCR) करण्याकरिता आल्या होत्या त्यांचा अहवाल मात्र येणे बाकी होता त्यामुळे त्या दोन्ही माय-लेकीचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. कोरोनाविषाणू बाबत केंद्र सरकार तर्फे वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांमध्ये केलेल्या भ्रामक व विखारी प्रचार तसेच केंद्र सरकारने वेळोवेळी या संक्रमणाला थांबविण्याकरिता काढलेले वेगवेगळे आदेश ज्यामध्ये अत्यंत निकृष्ट व निष्ठुर पद्धतीने प्रशासनाने केलेल्या अंमलबजावनीमुळे गाव खेड्यातील सर्व सामान्य माणसांच्या मनामध्ये प्रचंड भीती व दहशत निर्माण झाली.

परिणामी चाचणी करायला सुद्धा गावखेड्यातील मंडळी घाबरत आहे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला तर गाव आपल्याला वाळीत टाकेल ही भीती मनामध्ये असल्यामुळे गाव खेड्यातील मंडळी कोरोना चाचणी करण्यास घाबरत आहे .वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्या यामध्ये येणाऱ्या बातम्या ज्या पद्धतीने प्रस्तुत करन्यात यआल्या त्यामुळे गाव खेड्यातील माणसांच्या मनामध्ये कोरोना आजाराची प्रचंड भीती व दहशत निर्माण झालेली आहे या दहशतीमुळे गाव खेड्यातील लोक कोरोना चाचणी करण्यासाठी सुद्धा घाबरत आहे कारण जर आपल्याला कोरोना झाला तर गाव वाळीत टाकेल व आपण मेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती गावखेड्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे हे भीतीचे वातावरण नष्ट व्हावे असे प्रयत्न प्रशासनाकडून होतांना दिसत नाही .या दोन्ही मृत महिलांचे कोरोना अहवाल उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले असेल तर उपजिल्हा रुग्णालयाने ते सावंगी (झाडे) ग्रामपंचायतीला का कळविले नाही ?

त्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला नाही तर एकाच वेळी दोन्ही मायलेकी कशामुळे मरण पावल्या? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे . आज जी परिस्थिती सावंगी ( झाडे) या गावांमध्ये निर्माण झाली अशी परिस्थिती तर उर्वरित गावांमध्ये निर्माण झाली तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाची भीती गावकऱ्यांमध्ये एवढया प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे की शेजारी एकमेकांच्या घरी जाऊन सुद्धा पाहायला तयार नाही. त्याचाच परिणाम असा झाला की सदर दोन्ही महिलांचे मृतदेह तीन दिवस पडून राहिले मृतदेह कुजल्या नंतर जेव्हा दुर्गंधी पसरली तेव्हाच गावकऱ्यांना त्यांच्या मृत्यू बद्दल कळले ही अवस्था फार गंभीर आहे. सावंगी ( झाडे) या गावाला भेट दिली यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत महेश माकडे , दिनेश वाघ, जयंत धोटे, सावंगी (झाडे) चे उपसरपंच अजय कुडे पोलीस पाटील समीर झाडे हे उपस्थित होते