रुग कल्याण समित्या मार्फत जिल्हातील रूग्णालय मध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा तातडीने करा – अक्षय लांजेवार (जिल्हाधक्ष-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चंद्रपूर)

22

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.6मे):- चंद्रपूर जिल्हात कोरोनाने थैमान घातले आहे कोरोना वायरस चा पर्दुभव वाढत असल्यामुळे परिस्थिती अतंत्या चिंता जनक असून विषेता शाहिरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात पण गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रागर्त येणाऱ्या गावत दिवशें दिवस रुग्णामध्ये आकडा वाढत चालला आहे. अनेक गंभीर रुग्णांना अक्सिजन मिळत नसल्याने आपले जीव गमवावे लागत आहे रुग्ण कल्याण समिती मार्फत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा तर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात किमान वीस ऑक्सीजन सिलेंडर व दोन ऑक्सिजन कन्स्तेतर उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी अशी मागणी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे.

ऑक्सीजन सिलेंडर ची उपलब्धता राहिल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे प्राण वाचतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रुग्ण कल्याण समिती असून प्रत्येक रुग्ण रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती कडे असणाऱ्या निधीतून ऑक्सीजन सिलेंडर व ऑक्सिजन कन्सेत्रत्र घेण्यात यावे. या समितीकडे१. 50 लक्ष रुपये खर्चात असताना सध्याची covid-19 ची परिस्थिती लक्षात घेता या समित्यांमार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन सिलेंडर१०-१० ऑक्सीजन सिलेंडर देण्यात यावे जेणेकरून जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागणार नाही तरी याबाबत तातडीने निर्णय घेऊन रुग्ण कल्याण समिती मार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र दहा ऑक्सीजन सिलेंडर घेण्यासंदर्भात संबंधितांना तातडीने आदेश आदेशित करावे अशी मागणी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार यांनी केली