दोंडाईचा येथे मराठा समाजातर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

24

🔺नंदुरबार चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी मराठा समाजाचे व भाजप कार्यकर्ते एकवटले

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.6मे):- महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागील तत्कालीन भारतीय जनता पार्टी सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले. याला मुळ कारण म्हणजे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यात कमी पडली. म्हणून आज महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी नंदुरबार चौफुलीवर मराठा समाजाचे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटत शांततेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आज दिनांक ६ मे गुरूवार रोजी सकाळी ११.०० वाजता नंदुरबार चौफुली येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात विविध घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे नेते व माजी नगरसेवक श्री विजय मराठे यांनी सांगितले की,महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्याने मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकार कमी पडले म्हणूनच भाजप सरकारने दिलेले आरक्षण या सरकारने घालवून दिले. म्हणून आज रोजी मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. यावेळी आंदोलनात कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री नारायण भाऊसाहेब पाटील,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते श्री कामराज भाऊसाहेब निकम,देवेंद्र पाटील,किशोर वारुडे, दीपक बागल आदी उपस्थित होते.