गंगाखेड नगर परिषद वर्ग (अ) नगरपालिकेचा कार्यभार प्रभारी मुख्याधिकारी कडेच ?

28

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6मे):-नगर परिषदेस मागील चार महिन्यापासून तहसीलदार स्वरूप कंकाळ प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. एकीकडे कोरोना महामारीत आपत्कालीन परिस्थितीसह तालुक्याचा कार्यभार सांभाळताना नगर पालिकेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना ‘तारेवरची कसरत करावी लागत आहे चार महिन्यात प्रशासकीय कामकाजासह शहरविकासा प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत परिणामी परभणी जिल्हा प्रशासनाने गंगाखेड नगरपालिकेस पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा अशी एक मोठी मागणी जोर धरत आहे.

        दि.१८ जानेवारी २०२१ रोजी गंगाखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांची प्रशासकीय बदली झाली. त्यानंतर पालिकेचा प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार येथील तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. मागील चार महिन्यांत पालिकेच्या प्रशासकीय कारभारात खूप मोठी ‘नीरस’ता दिसते अशी अनेक नगरसेवकांचा आरोप आहे. परिणामी पालिकेचे अनेक महत्त्वपूर्ण प्रशासकीय कामकाज प्रलंबित राहिले असून अनेक बहुतांश विकासकामांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

याबाबतीत नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना मुख्याधिकारीपदाचा प्रभारी पदभार तहसिलदारांऐवजी पालमचे मुख्याधिकारी यांना द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षांच्या मागणीकडे कानाडोळा केला आहे. गंगाखेड पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी जिल्हा प्रशासनाकडून गंगाखेड पालिकेला कधी मिळणार आहे अशी चर्च नागरिक करत आहेत सेलू, सोनपेठला पूर्णवेळ मुख्याधिकारी, गंगाखेड मात्र प्रभारीच लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. अनेक विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता टेंडर ओपनिंग कर्मचारी वेतन आदी महत्त्वपूर्ण कामास अडथळे निर्माण होत असल्याची नाराजी पालिकेच्या लोकप्रतिनिधींमध्ये आहे.

       परभणी जिल्ह्यात बहुतांश नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी पदाचा बोलबाला आहे.अनेक मुख्याधिकार्‍यांना दोन ते तीन पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारीपद सांभाळावे लागत आहे. सोमवारी परभणी जिल्ह्यातील सेलू व सोनपेठ या नगर पालिकांना पूर्णवेळ मुख्याधिकारी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले. परंतु गंगाखेड शहराची अ वर्गाची पालिका मात्र मागील चार महिन्यांपासून प्रभारी पदावर चालत आहे, याचे गांभीर्य जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासनाला तर नव्हेच शिवाय प्रत्येक राजकारणात नको तेवढा इंट्रेस्ट दाखविणाऱ्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना नसल्याने शहर विकासाला खीळ बसली आहे. आगामी नगर पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना शहर विकासाच्या उडालेली लक्तरे  विद्यमान बहुतांश लोकप्रतिनिधींची सत्वपरीक्षा घेणारी एवढे मात्र निश्चित !