मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली ‘कमला लाईफसायन्सेस’ कंपनीला भेट

    49

    ?रेमडेसिविरचे उत्पादन वाढावे यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी सहकार्य करणार – अस्लम शेख

    ✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पालघर(दि.६ मे):- मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज देशात सर्वात जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी येथील ‘कमला लाईफसायन्सेस लिमिलेड’या कंपनीला भेट देत कंपनीचे चेअरमन डाॅ. दिगंबर झवर व उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला._

    _माध्यमांना प्रतिक्रीया देताना अस्लम शेख म्हणाले की, कंपनीच्या वाढलेल्या क्षमतेनुसार महिन्याला तिस लाख पेक्षा जास्त रेमडेसिविरचं उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे. कच्च्या मालाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास ५० लाखांपेक्षा जास्त रेमडेसिविरचे उत्पादन कंपनी घेऊ शकते. देशात रेमडेसिविरचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते._

    ……………………………………

    _रेमडेसिविरच्या होणाऱ्या काळ्या बाजाराबाबत अस्लम शेख यांची प्रतिक्रीया :_

    _राज्यात व देशात रेमडेसिविरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होतोय. रेमडेसिविरच्या एका कुपीची किंमत फार-फार तर दोन हजार असायला हवी मात्र काळ्या बाजारात वीस हजार पेक्षा जास्त दराने याची विक्री होत आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी आगामी काळात राज्य सरकार कठोर पऊलं उचलणार आहे._